Private Advt

पारोळा शहरात किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी : परस्परविरोधी गुन्हे

भुसावळ/पारोळा : शहरातील कुरेशी मोहल्ल्यात लहान मुलांच्या किरकोळ वादावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.

दोन्ही गटातर्फे पोलिसात गुन्हे
युसूफ खान रज्जाक खान कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला) यांच्या फिर्यादीनुसार रविवार, 20 रोजी रात्री 10 वाजता कुरेशी मोहल्ला येथे घराजवळ लहान मुलगा आवेश खान व गल्लीतील शेख निसार शेख मस्तान यांच्यात किरकोळ वाद झाले. या कारणावरून संशयीत शेख शाहरुख शेख निसार, मुमताजबी शेख निसार, हिना-बी शेख शाहीद, शेख शोएब शेख निसार, शेख सलमान शेख निसार, शेख सिराज शेख सत्तार, शेख नाजीम शेख सत्तार, शेख जुबेर शेख सत्तार, शेख अमजद शेख सत्तार, शेख फरीद, शेख शाहीद शेख दाउद, शेख पप्पू शेख दाउद, शेख जावेद शेख दाउद (सर्व रा. कुरेशी मोहल्ला) यांनी युसूफ खान व त्यांच्या पत्नीला मारहाण, शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी युसूफ खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पारोळा पोलिसांत 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास प्रवीण पाटील करत आहेत.

दुसर्‍या गटाचीही तक्रार
कुरेशी मोहल्ल्यातील शेख निसार शेख मस्तान यांनी दुसरी फिर्याद दिली. त्यानुसार रविवार, 20 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नास्कर गल्ली येथे आवेश खान याच्याशी किरकोळ वाद झाला होता. हा वाद त्यावेळी मिटला. त्यानंतर रात्री 10 वाजता कुरेशी मोहल्ला येथील घरासमोर शेख निसार हे बसलेले असताना शेख शोएब शेख युसूफ, शेख युसूफ शेख रज्जाक, मोहम्मद कयब शेख युसूफ, नसीमबी शेख युसूफ, शेख परवेज शेख आसिफ, शेख आसिफ शेख रज्जाक, शेख समिर शेख आसिफ, शेख दाणज शेख आसिफ, शाहिस्ता-बी शेख आसिफ (सर्व रा. कुरेशी मोहल्ला) यांनी शेख निसार यांच्यासह त्यांची पत्नी, जावयाला मारहाण, शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास प्रवीण पाटील करत आहेत.