Private Advt

पारोळा शहराजवळ दरोडा : तिघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पारोळा : राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार, 5 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन ट्रक चालकांना मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल लांबवण्यात आले होते. या प्रकरणी एक गुन्हा 6 मेला तर दुसरा गुन्हा 7 मेला दाखल झाला होता. दोन्ही गुन्ह्यातील एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्यानंतर अन्य तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लूट प्रकरणी दाखल होता गुन्हा
करंजी येथील दीपक भिला पाटील हे ट्रक (एम.एच.18 बी.जी. 0032) ने 2 मे रोजी बडोदा येथून ठिबकच्या नळ्या घेऊन 4 रोजी पारोळ्याला आले. अक्षय तृतीयेनिमित्त ते आपल्या गावी रात्री मुक्कामी राहिले. त्यानंतर हा माल खामगाव पोहोच करण्यासाठी जात असताना पारोळा शहरालगत बायपासवर रात्री 2.30 वाजता एक महिला व एक पुरुषाने त्यांच्या गाडीला हात दिला. गाडीचा वेग कमी करताच क्लिनर साईडने एका तरुणाने गाडीत घुसून मारहाण करत दीपक पाटील यांच्या खिशातील रोख पाच हजार व 8 हजारांचा मोबाईल हिसकावून पारोळा शहराकडे पळ काढला होता. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली होती.

तीन आरोपी जाळ्या
लूट प्रकरणी संशयीत भुर्‍या उर्फ नाजीमखाँ मुख्तारखाँ कुरेशी यास अमळनेर बायपास वरून तर तिसरा संशयीत लखन रमेश गायकवाड यास पारोळ्यातून ताब्यात घेतले आहे. पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक जाधव, एएसआय जयवंत पाटील, पोलिस नाईक सुनील साळुंखे, संदीप सातपुते, कॉन्स्टेबल राहुल कोळी, किशोर भोई, अभिजीत पाटील, महेंद्र साडे, राहुल पाटील यांनी दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.