पायलट आणि समर्थक आमदारांना कोर्टाकडून तूर्तास दिलासा

0

जयपूर: कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी राजस्थानमध्ये बंड पुकारला. त्यामुळे त्यांच्यावर कॉंग्रेसने कारवाई केली. त्यांची आमदारकी रद्द करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी नोटीस देखील पाठविली होती. दरम्यान हे प्रकरण कोर्टात गेले. दरम्यान जयपूर हायकोर्टाने सचिन पायलट यांच्या गटाला काही काळासाठी दिलासा दिला आहे. जयपूर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी बंडखोर आमदारांवर २४ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई कऱण्यात येऊ नये, असे आदेश विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांना दिले आहेत. आता या बंडखोर आमदारांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

राजस्थानच्या विधानसभा अध्यक्षांनी पायलट यांच्यासह १९ आमदारांना नोटीस पाठविली होती. त्यावर उत्तर द्यायला त्यांनी आमदारांना एका दिवसाची संध्याकाळपर्यंतची वेळ दिली होती. त्यानंतर या आमदारांवर लगेच कारवाई करण्याची शक्यता होती. पण या नोटिशीला पायलट व समर्थकांनी न्यायालयात जे आव्हान दिले होते त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्तींनी मंगळवार संध्याकाळपर्यंत अध्यक्षांनी या आमदारांबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले होते. दरम्यान, या प्रकरणावर राजस्थान हायकोर्टाने आज निकाल दिला. २४ जुलैपर्यंत पुन्हा दिलासा मिळाला आहे.

Copy