पादचारी महिलेस ट्रकने चिरडले

0

पाळधी – येथील पादचारी महिलेस एका ट्रकने चिरडल्याची घडना घडली असून या अपघात महिला जागीच ठार झाली असून परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. येथील भवानी प्लॉट भागात राहणारी महिला सावेराबी रहमान (वय-62) रा.पाळधी ता.धरणगाव चांदसर येथील नातेवाईकातील काका मयत झाल्याने त्याठिकाणी गेल्या होत्या. त्याकडून घरी परतात असतांना चांदसर रस्त्यावरील भवानी देवीच्या मंदीराच्या जवळून घरी जात असतांना अचानक ट्रक आल्याने ती महिला ट्रकच्या खाली येवून चिरडल्या गेल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर घटनस्थळी 400 ते 500 लोकांचा जमाव झाला होता. जमाव बघताच ट्रक चालकाने ट्रक थांबवून घटनास्थळाहून पळ काढला. त्या महिलेच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परीवार आहे.

Copy