पाथर्डे येथे शाळकरी मुलीचा विनयभंग; दोघांविरोधात गुन्हा

0

चाळीसगाव। तालुक्यातील पाथर्डे येथील 14 वर्षीय शाळकरी मुलीचा नेहमी पाठलाग करुन तिचा घरात एकटी असतांना हात धरुन विनयभंग केल्याची घटना दिनांक 6 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पाथर्डे येथे घडली असुन आरोपीच्या काकाने मुलीच्या पित्यास बदनामी करण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत मुलीने फिर्यादीत म्हटले आहे की पाथर्डे ता चाळीसगाव येथील तरुण आरोपी चंचीलाल (चन्नु) शबीलाल चव्हाण हा तिचा नेहमी पाठलाग करतो व शाळेच्या आवारात उभा राहतो. 6 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेवुन आरोपी चंचीलाल घरात घुसपन माझ्याशी का बोलत नाही म्हणुन हात पकडुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मुलीने सायंकाळी वडीलांना सांगीतला व संध्याकाळी आरोपी मुलाचा काका ज्ञानेश्वर दत्तु चव्हाण रा. पाथर्डे याने मुलीच्या बापाला तुम्ही माझ्या पुतण्या विरोधात पोलीसात तक्रार दिली तर तुमच्या मुलीला उचलुन घेवुन जावू अशी धमकी देवुन शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.