पात्र लाभार्थींना मिळणार हक्काचा घराचा निवारा

0

भुसावळात आमदार संजय सावकारे : प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्वेक्षणाला सुरुवात

भुसावळ- केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून शहरातील पात्र लाभार्थींचे घराचे स्वप्न पूर्ण होणार असून शहरातील अधिकाधिक पात्र लाभार्थींनी सहभाग नोंदवून हक्काचा निवारा उभारावा, असे आवाहन आमदार संजय सावकाने यांनी येथे केले. शहरातील प्रभाकर हॉलमध्ये सोमवारी त्यांनी लाभार्थी मागदर्शन शिबिरात मार्गदर्शन केले. प्रसंगी योजनेच्या सर्वेक्षणाला शहरातील प्रभाग पाच, सहा व सातमधून सुरवात करण्यात आली. या योजनेची नागरिकांना माहिती मिळावी यासाठी सोमवारी प्रभाकर हॉलमध्ये मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर आदी उपस्थित होते. या योजनेत सहभागी होण्यासाठीचे निकष व कागदपत्रांची पूर्तता या संदर्भात एजन्सीच्या अधिकार्‍यांनी नागरीकांना माहिती दिली. या योजनेचा सर्वाधिक फायदा गोरगरिब कुटूंबांना होणार आहे. मात्र समाजातील हा वर्ग अशिक्षीत असल्याने विविध कागदपत्रांची व निकषांची पूर्तता करण्यासाठी सक्षम नाही. यामुळे नगसेवक व भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोरगरीबांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यात मदत करावी, असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी केले.

नगरसेवकांसह नागरीकांची उपस्थिती
यावेळी नगरसेवक मुकेश पाटील, नगरसेविका अनिता सतीश सपकाळे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, गिरीष महाजन, सतीश सपकाळे, पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी तिन्ही प्रभागातील तब्बल 600 नागरिक उपस्थित होते.

Copy