Private Advt

पातोंडीत 34 वर्षीय युवकाची आत्महत्या

रावेर : तालुक्यातील पातोंडी येथे 34 वर्षीय युवकाने मंगळवारी मध्यरात्री आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पातोंडी येथील रहिवासी विकास उर्फ बापु मधूकर ढाकणे (34) या तरुणाने मंगळवारी मध्यरात्री घरात कोणीही नसतांना दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी त्यांचे वडील मधुकर विठ्ठल ढाकणे यांच्या खबरीवरुन रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास
पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन सोनवणे करीत आहे.