पातोंडा येथे दोन गटातील तुफान हाणामारीत 7 जखमी

0

चाळीसगाव। मुलीला बोलल्याच्या कारणावरून तालुक्यातील पातोंडा येथे 26 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास भिलाटीमध्ये 2 गटात तुफान हाणामारी होऊन त्यात लोखंडी गज व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने 7 जण जखमी झाल्याची घटना घडली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 7 जखमींवर येथील कर्तारसिंग परदेशी व वाय.पी.पाटील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.

बोलल्याचा राग आल्याने झाली मारहाण
रमेश सुरेश अहिरे (29, रा.पातोंडा ता. चाळीसगाव) फिर्यादीनुसार त्यांच्या मामाने आरोपींना तुम्ही मुलीला वाईट साईट का बोलतात असे बोलल्याचा राग येऊन 26 एप्रिल 2017 रोजी पातोंडा गावी भिलाटी भागात ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या घरासमोर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आरोपी शांताराम देवराम गायकवाड, परशुराम मधुकर गायकवाड, मुकेश पितांबर सोनावणे, लंकेश कैलास पवार, चैत्राम मधुकर पवार, जिभाऊ पितांबर सोनावणे सर्व रा पातोंडा ता चाळीसगाव यांनी गैर कायदा मंडळी जमवून त्यांना व नितीन युवराज मोरे, विजय युवराज मोरे यांना शिवीगाळ मारहाण करून त्यांना लाकडी दांडा व लोखंडी गजाने मारून दुखापत केली यात ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी वरील 6 आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दांडके व लोखंडी गज घेवून केली मारहाण
तर चैत्राम मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे नातेवाईक मुलांनी आरोपी ज्ञानेश्वर पांडुरंग गायकवाड यांच्या मुलीचे नाव घेतले, या कारणावरून संशयित ज्ञानेश्वर पांडुरंग गायकवाड, हिलाल काशिनाथ पवार नितीन युवराज मोरे, विजय युवराज मोरे, रमेश सुरेश अहिरे, भुरसिंग सुरेश अहिरे. भाऊसाहेब प्रकाश वाघ सर्व रा पातोंडा यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लाकडी दांडके व लोखंडी गज घेऊन 26 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांना व परशुराम मधुकर पवार, लंकेश कैलास पवार यांना शिवीगाळ मारहाण करून दमदाटी केली. या प्रकरणी त्यांचे फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला वरील 7 आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार शशिकांत पाटील करीत आहेत. या घटनेतील 7 जखमींवर शहरातील कर्तारसिंग परदेशी व वाय.पी.पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.