पाण्यासाठी तुकाराम नगरवासीयांचा पालिकेवर मोर्चा

0

भुसावळ । तीव्र उन्हाळा सुरू होण्यापुर्वीच पाण्याची टंचाई तुकाराम नगरमधील रहिवासी सहन करीत आहे. शेकडोच्या संख्येने 27 रोजी पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. शहरातील शिरपुर-कन्हाळे रस्त्यालगत असलेल्या तुकाराम नगर हे नगरपालिकेच्या क्षेत्रात असून गेल्या अनेक वर्षापासून येथे पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे. कडक उन्हाळा सुरू होण्यापुर्वीच येथील कुपनलीका कोरड्या झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेने या परिसरात जलवाहिनी टाकणे गरजेचे आहे. या परिसरापासून किमान 200 मिटर लांबीवर पालिकेची जलवाहिनी आहे.

पालिकेने द्यावा टँकरचा खर्च
या परिसरात पालिकेची जलवाहिनी येण्यास दिर्घकाळ लागत आहे. त्यामुळे जो पर्यंत जलवाहिनी टाकून मिळत नाही तोपर्यंत पालिकेच्या खर्चातून टँकरने पुरवठा केल्यास रहिवाशांना दिलासा मिळू शकतो. जलवाहिनी टाकण्यासाठी लागणार्‍या कालावधीत पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटू शकते. जोपर्यंत जलवाहिनी टाकण्यात येत नाही तो पर्यंत किमान पालिकेने टँकरने पाणी पुरवठा करावा.

पालिकेवर मोर्चा नेेला असता मुख्याधिकारी बाविस्कर यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला त्यांनी अगोदरप्रमाणे स्वखर्चातून टँकर मागवून पाणी घेण्याचे सांगितले यातून प्रशासनाची उदासिनता दिसून येते.
– दुर्गेश ठाकूर, नगरसेवक

यांनी केल्या स्वाक्षर्‍या
या निवेदनावर या निवेदनावर आर.सी. चौधरी, शालीग्राम चौधरी, भुषण पाटील, विजय भिरुड, नितीन चव्हाण, पराग भोळे, मनोहर पाटील, डिगंबर जावळे विजय चौधरी, राम जगताप, प्रवीण ठाकूर, नामदेव महाजन, दिपक ढाके, चंद्रकांत चौधरी, भुषण पाटील,जयंत वाघोदे, संगिता पाटील, वासुदेव नेहेते, दामू लोखंडे, सारंग ठाकूर, गंगाराम पवार, कमल सुरळकर, चमेली कोळी, सुरेखा पाटील, विश्‍वानंद सोनवडले, मधुकर सपकाळे, शकुंतला ठाकुर, रेखा नेहेते, ज्योती चाटे आदींंच्या स्वाक्षरी आहेत.