पाण्यात बुडाल्याने सख्ख्या बहिणींचा करुण अंत

0

पिंपळगाव बु.॥ येथील वाघूर नदीवरील दुर्घटना

पहूर- पाय घसरल्याने पाण्यात बुडून दोघा बहिणींचा करुण अंत झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता पिंपळगाव बु.॥ येथील वाघूर नदीवर घडली. रीजवाना कलीम तडवी (10) व सुहाना कलीम तडवी (4) या मृत दोन सख्ख्या बहिणींची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास या दोघे बहिणी भावजयीसोबत धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. सुहानाचा पाय घसरून ती पाण्यात पडली. तिला पकडण्यासाठी रीजवानाही पुढे गेली असता दोन्हीही पाण्यात बुडाल्या. भावजयीने आरडाओरड केली त्यावेळी काही जणांनी तेथे धाव घेतली व मुलींना बाहेर काढले, मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.

Copy