पाणीप्रश्‍नी भाजपचे आंदोलन स्थगित

0

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक चार मधील संकल्पनगरी वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी बोर्डाकडे अनेक तकेारी करुनही सुधारणा होत नव्हती. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी स्थानिक रहिवासी व भाजपचे कार्यकर्ते सर्यकांत सुर्वे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. रात्री उशीरा बोर्डाच्या अधिकार्‍यांनी आंदोलकांची भेट घेऊन योग्य कार्यवाहीचे आश्‍वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.

सदस्य, सीईओंनी घेतली आंदोलकांची भेट
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वॉर्ड क्रमांक चार मधील संकल्पनगरी वसाहतीत विविध नागरी सुविधांच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने मंगळवारी उपोषण करण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष अ‍ॅड. कैलास पानसरे, ज्येष्ठ कार्यकर्ते अंजनी बत्तल, लहूमामा शेलार, विनायक काळे, सुनील अगरवाल, अनिल खंडेलवाल, बाळासाहेब शेलार, बाळासाहेब झंजाड, अरुण माळी, सुशीला नरवाल, स्मिता दाभाडे, सारिका मुथा आदी सहभागी झाले होते. माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी आंदोलकांची भेट घेऊन या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला होता. सायंकाळी सदस्य विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, हाजीमलंग मारिमुत्तू, ललित बालघरे, उपाध्यक्षा अरूणा पिंजण यांनी आंदोलकांची भेट घेतली. मुख्याधिकारी अभिजीत सानप यांनीही उशीरा आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.