पाणीपुरवठा योजनेचे 10 कोटीचे वीज बिल अदा

0

जळगाव । जिल्हापरिषदेंतर्गत राबविण्यात येणार्‍या सामूहिक पाणीपुरवठा योजनांची थकीत 10 कोटी रुपयांची वीज बिले जिल्हा परिषदेमार्फत महावितरणाला अदा करण्यात आले. 13 कोटी 81 लाख थकबाकी असून शनिवारी 18 रोजी 10 कोटी 38 लाख रुपयाचा धनादेश जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता एस.बी. नरवाडे यांनी जळगांव मंडळाचे अधिक्षक अभियंता संजयआकोडे यांना सुपूर्द केला.

13 कोटी 81 लाख रुपये पाणी पुरवठा योजनांचे थकले
ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या देखभाल- दुरुस्तीतून ही तरतूद केली आहे. तसेच या योजनांच्या देखभालीसाठी तालुकास्तरावर समिती नियुक्त करून त्या समितीकडून कार्यान्वित केली जाणार आहे. जिल्हाभरातील विविध सामूहिक पाणीपुरवठा योजनांतील विजेची थकबाकी मोठ्या प्रमाणात थकल्याने महावितरण कंपनीने या योजनांवरील वीजपुरवठा खंडित केला होता. परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीसच अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. परिणामी, ग्रामस्थ लोकप्रतिनिधींकडून ओरड वाढली होती. थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने ती ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातून भरणे अशक्य होते. यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या देखभाल- दुरुस्तीतून पहिल्या टप्प्यात 10 कोटी रुपयांची थकबाकी भरण्याचा निर्णय घेण्यात आला. हीयोजना राज्यातील वीज बिलाची थकबाकी असलेल्या सर्व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना उच्च दाब उपसा जलसिंचन योजनांसाठी लागू राहील. उर्वरित थकबाकी एप्रिल, मे, जून जुलै या महिन्यांच्या चालू वीज बिलासोबत भरणे आवश्यक आहे.