पाणीपुरवठा करणारी रंगावली नदीवरील के.टी.वेअर बंधारा पुर्णपणे कोरडा

0

नवापुर (हेमंत पाटील) । नवापुर शहरला पाणीपुरवठा करणारी रंगावली नदीवरील के.टी.वेअर बंधारा हा पुर्णपणे कोरडा ठणठण झाला आहे. मागील काही दिवसांपासुन तापमानात जास्त वाढ झाल्यामुळे पाण्याचे प्रमाण हे कमी झाले आहे. तीव्र उन्हाळा असह्य होत असून तापमान 43 अंशापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे काही दिवसात नवापुर शहराला पाण्याची भीषण टंचाईला समोर जावे लागण्याचे चिञ दिसु लागीे आहे. काही वर्षापासुन उन्हाळ्यात किरकोळ पाणी टंचाई जाणवत आहे. नवापूर पाण्याचा बाबतीत फार सुखी आहे. नगरपालिका दिवसातुन तीन वेळा शहराला तीनदा पाणी पुरवठा करायची पण मागीन वर्षा पासुन रंगावली नदी कोरडी पडत असल्याने एकदाच पाणी द्यावे लागत आहे. कारण रंगावली नदीजवळ असणारे शेतकरी मोटारी लावून रंगावलीतुन मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करत असल्यामुळे यावर्षी नवापुर शहरात बारमाही वाहनारी रंगावली नदीपात्र पुर्णपणे कोरडे झाले आहे. त्यामुळे प्राण्यांना पाणी पिण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

काही वर्षांपासुन नवापुर शहराची लोकसंख्येत ही झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे पाण्याची मागणी जास्त प्रमाणात वाढली आहे. यापुढे एक दिवसाआड पाणी मिळण्याचे आसार आता पासुन दिसु लागले आहे. नवापुर शहरालगत मरीमाता मंदीराजवळ नवापुर नगरपालिकेने के.टी वेअर बंधारा बनविला आहे. हा बंधारा नवापुर शहराची पाण्याची तहान भागवीत असतो. यहा के.टी वेअर बंधारा एप्रिल महिन्यातच आटला आहे.आता पर्याय म्हणून या बंधार्‍याजवळ काही वर्षा पुर्व एक विहीर तयार करण्यात आली असून या विहीरीद्वारे शहराला आता पाणीपुरवठा केला जात आहे.

नवापुर शहरातील के.टी वेअर बंधार्‍यातील पाणीसाठा संपला असुन सद्या बंधायाजवळील विहीरीतील पाणी नवापुर शहरातील नागरीकाना पुरविले जात आहे. पाण्याची समस्या गंभीर होऊ नये म्हणुन एक दिवसा आडपाणी देण्याचा निर्णय लवकर घेण्यात येईल. नागरीकानी पाण्याचा वापर कमी करा व नगरपालिकेला सहकार्य करावे.

मिलिंद भामरे, कार्यालय निरीक्षक, नगरपालिका नवापुर

नागरीकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता
या विहीरीला नगरपालिकेने पक्के बांधकाम करुन विहीरीतील गाळ काढून जिंवत काही वर्षापुर्वी केली होती, या विहीरीमुळे शहराला पाणीपुरवठा होत आहे. तसेच नवापुर नगरपालिकेने प्रत्येक वार्डात पाण्याचे बोर करुन दिल्यामुळे शहराला पाणी मिळत आहे, मात्र नागरीक हॅण्ड पंप तसेच बोरींग या दोन्हीचा वापर करत असल्याने बोर बंद पडत आहे. जमिनीतील पाणी कमी झाले आहे, त्यामुळे पाणी टंचाई जाणवते. पाण्याबाबत नगरपालिकेने भविष्यासाठी मोठी योजना तयार करणे गरजेचे झाले आहे.