पाणीटंचाई समस्येबाबत उमपा तील सहा नागरसेवकांचे आमरण उपोषण

0

उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालीकेतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये गेल्या वर्षभरापासुन भिषण पाणीटंचाई असुन,या समस्येबाबत उमपातील शिवसेनेचे सहा नगरसेवकांनी आज पासून भर उन्हात आमरण उपोषण केल आहे,

उल्हासनगर महानगरपालिकेची प्रथमच चार चा एक प्रभाग या प्रमाणे निवडणूक पार पडली ,त्यामुळे प्रभाग रचना मोठी झाली,मतदार वाढले,तसेच पूर्वी च्या नगरसेवकना या बदला मुळे मोठा फटका पडला,उल्हासनगर महानगरपालीकेतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये गेल्या वर्षभरापासुन भिषण पाणीटंचाई असुन या प्रभागात चार हि नगरसेवक शिवसेनेचे निवडणुन आले ,त्यात मिताली सोनू चानपुर, लिलाबाई आशान, शेखर यादव ,सुनील सुर्वे हे नगरसेवक निवडणून आले, तसेच शिवसेनेने महापालिकेत जे स्वीकृत दोन नगरसेवक दिले अरुण आशान आणि सुरेंद्र सावंत ते सुद्धा याच प्रभागतले आहेत,हा प्रभाग शिवसेनेचा गड मानला जातो आणि याच प्रभागतील व्हीनस सिनेमा ,अलंकार सोसायटी हा भाग गेल्या वर्षभरपासुन पाण्यापासून वंचित असल्याने येथील मतदारानी या शिवसेनेच्या सहा हि नगरसेवकांची झोप उडवून दिली आहे ,दिवस रात्र पाणी पाणी करुन येथील मतदार या नवनिर्वाचित नगरसेवकानचा पाठलाग सोडत नसलेल्या अखेर आज या सहा नगरसेवकानी आपल्या प्रभागतील व्हीनस सिनेमा रोड वर भर उन्हात आमरण उपोषण सुरु केल असुन ,जो पर्यन्त महानगरपालिका प्रशासन या प्रभागतील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी पाऊल उचलत नाही,तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे नगरसेवक सुनिल सुर्वे यांनी म्हटलं .