पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

0

जळगाव । जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा या वर्षी पाणी टंचाई कमी स्वरूपात असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. येत्या दोन महिन्यात ही पाणी टंचाई वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, जळगाव वगळता इतर तालुक्यात अजून तरी पाणी टंचाई नाही. मात्र अमळनेर तालुक्यातील 13 गावांना पाच टँकर, पारोळा तालुक्यात 3 गावांना तीन टँकर आणी जळगाव तालुक्यात एक अशी 17 गावांना 9 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. भविष्यात ही पाणी टंचाई तीव्र होण्या आगोदर जिल्हा प्रशासनाकडून विहीर अधिग्रहण, तात्पुरती पाणी पुरवठा योजना, नविन विंधन विहिरी घेणे या कामांना अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. यात सध्या मुक्ताईनगर तालुक्यातील 19 गावातील 19 विहीर अधिग्रहण, बोदवड -3, भडगाव -2, जळगाव -1, जामनेर-6, धरणगाव-9, अमळनेर- 33, पारोळा -4 आणि चोपडा तालुक्यातील 2 असे एकुण 79 विहीरी अधिग्रहण केले आहे. नविन विंधन विहीरीसाठी धरणगाव -29 आणि चोपडा- 9 आणी तात्पुरती पाणी पुरवठा योजनेत फक्त जामनेरातील 1 योजना प्रशासनाने ताब्यात घेतली आहे.

जिल्ह्यात अमळनेर व पारोळा आणि धरणगाव या तालुक्यात प्रचंड प्रमाणावर पाण्याची कमतरता असल्यामुळे यावर्षी 79 विहिरी अधिग्रहण, 37 नविन विंधन विहीर घेण्यात आले आहे. तर नविन 4 कुपनलिका केले आहे तर पारोळा तालुक्यातील एका विहीरीचे खोलीकरण होणार असून याचा फायदा पाणी टंचाईग्रस्त गावांना होणार आहे. त्याच प्रमाणे पाचोरा तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी बहुळा प्रकल्पावरून पाईप लाईन टाकून पाचोरेकरांची पाण्याची टंचाई कायमची दुर झाली आहे.