पाडळसरे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी अपूरा

0

अमळनेर । पाडळसरे धरणाला मी भेट देवून फारसा फरक पडला नसता त्यामागे काही कारणे होती. या प्रकल्पाला मार्गी लावण्यासाठी राज्यशासनचा निधी पूरेसा नसून त्यासाठी या प्रकल्पाचा समावेश केंद्रीय जलआयोगात करूनच मोठ्या प्रमाणात निधीची ऊपलब्धता करता येवू शकते, अशी स्पष्टोक्ती जलसंपदामंत्री ना. गिरिश महाजन यांनी दिली. जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने ते अमळनेरात आले होते. माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील यांचे निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

याचे श्रेय विरोधकांनी घेवून नये- ना. महाजन

जिल्ह्याचे या खात्याचे मंत्री असूनही त्यांनी पाडळसरे धरणाला अजून साधी भेटही का दिली नाही? या प्रश्रावर त्यांनी आता निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर दि25 फेब्रूवारी नंतर अधिवेशन सूरू होण्यापूर्विच धरणस्थळी मी तापी पाठबंधारे विभागाच्या आधिकार्‍यांची टिम घेवून पाहणी करणार असून याचे श्रेय मात्र कोणी विरोधकांनी घेवू नये, असा सूचक सल्लाही त्यांनी दिला. नूकतेच 35 कोटी रूपये या धरणासाठी औद्योगिक वसाहत महामंडऴाकडून देण्यात आले ते काम आमच्याच सरकारचे असून कोणी एक महिनाही पाण्यात बसले असते तरी दिले नसते. त्यासाठी आमदार स्मिता वाघ यांनी केलेला पाठपूरावा महत्वाचे असल्याचे जलसंपदामंत्री ना. महाजन यांनी स्पष्ट केले. जि.प. निवडणूकीत सर्वत्र चांगले वातावरण असून 40चे वर जागा निवडून आम्हाला एकहाती सत्ता मिळेल तर राज्यातील 10 नगरपालीकांमध्ये आश्चर्यकारक निकाल हाती येईल असे सांगून भविष्यातील राजकिय परिस्थितीनूसार मित्रपक्षांशी यूतीबाबत विचार होवू शकतो. मात्र तशी परिस्थिती ऊदभवणार नाही, आम्हाला एकहाती यश मिळेल अशी खात्री व्यक्त केली. यावेळी आमदार स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, किशोर काळकर, माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील, सूभाष चौधरी, बजरंग अग्रवाल आदिंची उपस्थिती होती.