पाटाच्या पाण्यात बुडाल्याने यावलमधील चिमुकल्यांचा मृत्यू

पाटाच्या पाण्यात बुडाल्याने यावलमधील चिमुकल्यांचा मृत्यू

यावल : पाटाच्या पाण्यात बुडाल्याने यावलमधील चिमुकल्यांचा मृत्यू मित्रांसोबत पोहण्यासाठी दोघे चिमुरड्यांचा पाटाच्या पाण्यात अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घटली. रात्री उशिरा चिमुकल्यांचा शोध न लागल्याने गुरूवारी शोधमोहिम राबवण्यात आणल्यानंतर दोघांचा मृतदेह आढळताच नातेवाईकांनी टाहो फोडला. दीपक जगदीश शिंपी (12) व गणेश उर्फ युवराज बापू दुसाने (14, सुदर्शन चित्र मंदिर परीसर) अशी मयत चिमुकल्यांची नावे आहेत.

पाण्याचा अंदाज न अडाल्याने बुडाले चिमुकले
यावल शहरातील या सुदर्शन चित्र मंदिर परीसरातील सरस्वती विद्यामंदीर भागातील दीपक शिंपी व गणेश दुसाने हे चिमुकले आपल्या मित्रांसह यावल-भुसावळ मार्गावरील असलेल्या हतनुर पाटबंधारे विभागाच्या पाटचारीत पोहण्यासाठी गेले मात्र पाणटचारीत शेती पिकांसाठी पाणी सोडण्यात आल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने चिमुकले बुडाले. सोबतच्या मुलांनी वाचवण्यासाठी आरडा-ओरड केली मात्र मदत न मिळाल्याने चिमुकले पाटाच्या पाण्यात बुडाले. ही घटना बुधवारी सायंकाळी घडल्यानंतर शोध कार्य सुरू करण्यात आले मात्र रात्री उशिरापर्यंतपर्यंतही चिमुकल्यांचा शोध लागला नाही. गुरुवारी सकाळी पुन्हा शोध मोहिम राबवल्यानंतर चिमुकल्यांचा मृतदेह आढळताच उपस्थितानाही गहिवरून आले.