पाटली पूत्र एक्स्प्रेसमधून पाच लाखांचा ऐवज चोरीस

भुसावळ : महिला प्रवासी झोपेत असल्याची संधी चोरट्याने साधत पाच लाखांचा ऐवज लांबवला.  पाटलीपूत्र एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली. कल्याण येथील रहिवासी रजिया सुलताना मुजाहिद खान या बक्सर ते कल्याण असा प्रवास पाटलीपुत्र एक्स्प्रेसच्या बी-५ या डब्याच्या बर्थ क्रमांक ३३ व ३६ सीटवरून २९ मे या दिवशी करीत होत्या. प्रवासात महिला झोपल्याची संधी साधत चोरट्याने खान यांची बॅग लांबवली. त्यात सोन्या-चांदीचे दागिणे, चार हजार ५०० रुपये रोख, मोबाईल असा सुमारे पाच लाख ६२ हजार २४० रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो भुसावळ जीआरपी पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री वर्ग करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुरेश सरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक केरूळकर करीत आहे.