Private Advt

पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधून 15 हजारांची रोकड लांबवली

भुसावळ : पाटलीपुत्र एक्सप्रेसच्या बोगी क्रमांक एस-7 मधील सीट क्रमांक 72 वरुन प्रवास करीत असलेल्या मोहम्मद फारूक (प्रतापगड, उत्तरप्रदेश) हे प्रवास करीत असताना झोपेचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांची बँग लांबवली. त्यात 15 हजारांची रोकड तसेच 300 रुपयांची चिल्लर, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, आधार कार्ड होते. याप्रकरणी मोहम्मद फारूक यांनी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा इटारसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.