पाटणा येथील एकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

0

चाळीसगाव । तालुक्यातील पाटणा गाव येथे 45 वर्षीय ईसमाचा गळफास घेतल्याने शुक्रवार 5 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजेपुर्वी मृत्यू झाला असुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील पाटणा गाव येथील बाळु छबु साळुंखे 45 यांचा मृतदेह दिनांक 5 मे 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या राहते घरी पत्र्याचे शेडचे लोखंडी पाईपला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या मयत स्थितीत मिळुन आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला विलास प्रल्हाद काळे 41 रा पाटणा ता चाळीसगाव यांच्या खबरीवरुन 23/2017 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास हवालदार दिलीप रोकडे करीत आहेत.