पाच हजार कोटींचा चुना लावून गुजरातचा आणखी एक व्यापारी फरार

0

गांधीनगर-पाच हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला स्टर्लिंग बायोटेकचा मालक नितीन संदेसरा याला दुबईतून ताब्यात घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. पाच हजार कोटींचा घोटाळा केल्यामुळे सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर असणारा नितीन संदेसरा दुबईत नसून नायजेरियात लपला आहे.

नितीन संदेसरा आपला भाऊ चेतन, वहिनी दिप्तीबेन आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत नायजेरियाला पळून गेल्याचे सीबीआय आणि ईडीकडून सांगण्यात आले होते. भारताचा नायजेरियासोबत कोणताही प्रत्यार्पण करार नसल्याने सध्या तरी नितीन संदेसरा याला भारतात आणणे शक्य होणार नाही.

Copy