Private Advt

पाच वर्षांखालील मुलांवर मास्कची सक्ती नाही – केंद्र सरकार

नवी दिल्ली – ६ ते ११ वर्षे वयोगटातील मुले मास्क वापरू शकतात. मात्र ते त्यांच्या मास्क वापरण्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल. १२ वा त्यापेक्षा जास्त वयाच्या किशोरांनी प्रौढांप्रमाणेच मास्क वापरला पाहिजे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणांच्या प्रकरणात स्टेरॉइडचा वापर हानिकारक आहे. संसर्ग गंभीर असला तरी १८ वर्षांखालील किशोरांसाठी अँटिव्हायरल वा मोनोक्लोनल अँटिबॉडीच्या वापराची शिफारस नाही.

सरकारने गुरुवारी लहान मुले आणि १८ वर्षांच्या आतील किशोरांसाठी कोरोना औषधे व मास्कच्या वापरासाठी सुधारित नियम जारी केले आहेत. त्यानुसार, पाच वर्षे व त्यापेक्षा लहान मुलांसाठी मास्क वापरण्याची शिफारस केलेली नाही.

 

देशात दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेमध्ये मृत्यू खूप कमी : केंद्र
केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेपेक्षा कमी मृत्यू झाले आहेत. कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी गंभीर होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. वाढत्या लसीकरणामुळे मृत्यू कमी होत आहेत.