पाच लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

Harassment of married woman of Kingaon for bringing five lakh rupees for husband’s office: Case against five suspects including husband यावल : पतीच्या ऑफिससाठी पाच लाख रुपये न आणळल्याने यावल तालुक्यातील किनगाव गावातील विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह पाच संशयीतांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पैसे नप आणल्याने विवाहितेला पतीसह पाच जणांनी शिविगाळ करीत धमकी दिली.

नाशिकमधील संशयीतांकडून पाच लाखांची मागणी
किनगाव बुद्रुक, ता.यावल येथील माहेर असलेल्या 30 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह निलेश राजेंद्र सोनवणे (श्रृती रो.हाऊस क्रमांक 1, मार्गशीष सेक्टर सिडको, नाशिक) यांच्याशी झाला होता. लग्नानंतर पती निलेश राजेंद्र सोनवणे, सासू सीमा राजेंद्र सोनवणे, ननंद प्रज्ञा सागर निकम, नंदोई सागर शंकरराव निकम, मावस सासरे किशोर उत्तमराव हिरे या पाच जणांनी विवाहितेचा पतीला ऑफिससाठी पाच लाख रुपये आणावे म्हणून छळ सुरू केला.

पाच संशयीतांविरोधात गुन्हा
विवाहितेने माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने आरोपींनी शिविगाळ करून धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला तसेच जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. या प्रकरणी विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात धाव घेत कैफियत मांडली. यानंतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.