Private Advt

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव। ‘फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये’ असे सांगून 22 वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे, धुळे शहरातील शारदा नगर येथील 22 वर्षीय विवाहितेला पुणे येथे ‘फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये’ असे सांगत तिच्यावर शारीरिक व मानसिक छळ पती सुमित कृष्णा जाधव, सासरे कृष्णा उत्तम जाधव, सासु प्रमिला कृष्णा जाधव व नणंद गौरी जाधव आदींनी केल्या. सुरूवातीला घरात विवाहितेला चांगली वागणूक मिळाली. मात्र, नंतर पाच लाख माहेरून घेऊन ये असे सांगून तिला गर्भपाताच्या गोळ्या सासरच्या मंडळींकडून दिल्या जात होत्या. तसेच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून पतीकडून अनैसर्गिक संभोग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तत्पूर्वी 8 जानेवारी 2020 ते 9 जानेवारी 2021 या कालावधीत विवाहितेला अमानवी वागणूक देण्यात आली. या सर्व गोष्टीला कंटाळून विवाहितेने मेहूणबारे पोलीस स्थानकात भादंवि कलम- 377, 498 अ, 294, 323, 343, 504, 506, 34 अशा विविध कलमान्वये पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि पवन देसले यांच्या निर्देशानुसार प्रकाश चव्हाण करीत आहेत.