Private Advt

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणाविरुद्ध गुन्हा

जळगाव । तालुक्यातील नशिराबाद येथील माहेरवाशीणीचा सोनसाखळी व पाच लाख रुपयांसाठी छळ करणार्‍या पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रियंका सुरेश महाले (वय 25, रा. भुसावळ, ह.मु. नशिराबाद) हिचे लग्न भुसावळ येथील सुरेश दयाराम महाले याच्याशी झाले आहे. लग्नानंतर विवाहितेला छोट्या-मोठ्या कारणावरून टोमणे मारणे सुरू झाले. महिलेचे पती सुरेश महाले यांनी प्लॉट घेण्यासाठी पाच लाख व सोनसाखळी घेऊन ये, असे सांगून शिविगाळ व मारहाण केली. सासरे दयाराम महादेव महाले, सासू सिंधूबाई दयाराम महाले, दीर प्रवीण दयाराम महाले (सर्व रा. भुसावळ रेल्वे कॉटर्स), नणंद सोनिया घनश्याम सावळे, नंदोयी घनश्याम सावळे (रा. अहमदनगर) यांनी 30 डिसेंबर 2020 रोजी महिलेला घराबाहेर काढून दिले. त्यामुळे ती नशिराबादला माहेरी गेली. याप्रकरणी विवाहितेने फिर्याद दिली. त्यावरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.