पाच रूपये हरविल्याने आईची मुलीलाच अमानुष मारहाण

0

जळगाव । पोटच्या अपत्याला साधे खरचले तरी आईला त्रास होतो. मात्र याला जळगाव रेल्वे स्थानकावरील आई अपवाद ठरली आहे. तिच्या 3 वर्षाच्या चिमुकलीकडून पाच रूपये हरविल्याने सोमवारी तिला अमानुषपणे मारहाण करून डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाणकरून चटके दिले आहेत. त्या चिमुकलीला एका महिलेने मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

रेल्वे स्थानकावर भिक मागून पोट भरणार्‍या पुर्णिमा राजू आदिवासी (वय 30) या महिलेला पुजा (वय 3), राहूल (वय 10) दोन मुले आहेत. पुजाजवळ दिलेले 5 रुपये सोमवारी हरवले. त्यामुळे पुर्णिमाने नशेत असताना पुजाला अमानुष मारहाण करून प्लॅटफॉर्मवर फरफटत नेले. तसेच लोखंडी रॉडने मारहाण करून तिच्या डोक्याला चटके दिले. त्यामुळे पुजा गंभीर जखमी झाली. मात्र सोमवारी आणि मंगळवारी दिवसभर पुजा जखमी अवस्थेत रेल्वे स्थानकावर पडलेली होती. त्यावेळी आशा नाडे (हरीविठ्ठलनगर) या महिलेला ती दिसली. आशा नाडे यांनी पुजाला मंगळवारी सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास उपचारासाठ सिव्हीलमध्ये दाखल केले.