पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांना नजरकैदच कायम

0

नवी दिल्ली- कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण निकाल दिला. भीमा कोरेगाव प्रकरणात पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांची अटक रद्द करण्याची, या अटकेच्या कारवाईची एसआयटी चौकशी करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली. मात्र पुढील ४ आठवडे अटक करता येणार नाही, नजरकैदच कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. या काळात त्यांना कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची संधी देण्यात आली आहे.

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या अटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर आज न्यायालयाकडून निकाल सुनावण्यात येईल.

Copy