Private Advt

पाचोऱ्यात कॉंग्रेसने पाडले शिवसेनेला खिंडार

पाचोरा – कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा  खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प दिन साजरा करण्यात आला. यावेळी  पाचोरा येथे शिवसैनिकांचा कॉग्रेसमध्ये प्रवेश करण्यात आला.
          यावेळी जारगांव येथील शिवसेनेचे शरीफ शेख, शंकर सोनवणे, यांचे कॉग्रेस मध्ये प्रवेशाचे सचिन सोमवंशी यांनी स्वागत केले. यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जेष्ठ पदाधिकारी माजी प. स. सभापती शेख  शेख फकीरा, राजेंद्र महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, नंदकुमार सोनार, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, कृ. बा. प्रशासक प्रा. एस डी पाटील, महिला तालुका अध्यक्षा कुसुम पाटील, जिल्हा महीला पदाधिकारी अॅड. मनिषा पवार, संगीता नेवे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड अबांदास गिरी, प्रकाश चव्हाण, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.