पाचोऱ्यात आणखी ३ कोरोना बाधित रूग्ण; एकूण रुग्ण १६३

0

जळगाव : पाचोरा व भडगाव येथे स्वॅब घेण्यात आलेल्या 91 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 88 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर तीन व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या तीनही व्यक्ती पाचोरा येथील आहे. यामध्ये 1 वर्षीय मुलगा, 36 वर्षीय पुरूष तर 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

निगेटिव्ह आढळलेल्या सर्व व्यक्ती या पाचोरा आणि भडगाव येथील आहेत. यात प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचाही समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 163 झाली आहे. यापैकी 20 रूग्णाचा मृत्यू झाला आहे तर तीन व्यक्ती बरे झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.