पाचोऱ्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये युवकाची आत्महत्या

0

जळगाव: कोरोना चाचणीचा अहवाल येण्यापुर्वीच पाचोऱ्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ जुलैला पाचोरा तालुक्यातील बांबरूड (राणीचे) येथील ३३ वर्षीय युवक पाचोऱ्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाला होता. त्याची तपासणी करण्यात आली आहे. मात्र अहवाल येण्यापुर्वीच त्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी यांनी भेट देत चौकशी केली. आत्महत्येमागील ठोस कारण अद्याप पुढे आलेले नाही.

Copy