पाचोर्‍यात शिवसेनेतर्फे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा पुतळा दहन

0

जळगाव । गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रात सतत दुष्काळ, गारपीठ होत असल्याने शेतकरी संकटात आहे. तीमालाला योग्य भाव नसल्याने व खते बि-बियाण्याचे भाव गगणाला भिडले असल्याने शेतकरी अडचणीत आहे. तुर खरेदीवरील बंदी उठवून तुरला भाव देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. शेतकर्‍यांच्या मागणीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने पाचोर्‍यात शिवसेनेतर्फे त्यांचा जाहिर निषेध करण्यात आला. दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन यावेळी करण्यात आले. बेजबाबदार वक्तव्य करणार्‍या दानवेंची तातडीने पदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. मागणीचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.