पाचोर्‍यात लाखाची रोकड लांबवण्याचा प्रयत्न फसला : एकाला अटक

लाखाची रोकड लांबवण्याच्या प्रयत्नात चोरटा जाळ्यात : पाचोर्‍यातील घटना

पाचोरा : शहरातील रेल्वेस्थानकाजवळ लावलेली दुचाकीला लावलेल्या पिशवीतून एक लाखांची रोकड लांबविण्याच्या प्रयत्नात एकाला अटक करण्यात आली. नाना देवराज शिंदे (20, रा.गणपत गड, सोलापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सतर्कतेने वाचली लाखाची रोकड
श्रीराम आनंद चौधरी (67, रा.परधाडे, ता.पाचोरा) हे दुचाकीने रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या आंबेडकर पुतळ्याजवळ शुक्रवार, 8 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता आले असता संशयीत आरोपी नाना देवराज शिंदे (20, रा.गणपत गड, सोलापूर) हा दुचाकीजवळ आला व त्याने रोकड लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र श्रीराम चौधरी यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. संशयीत आरोपी नाना शिंदे यास पाचोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार यशवंत घोडसे करीत आहेत.

Copy