पाचोर्‍यात अ‍ॅम्बुलन्सला आग

पाचोरा – ग्रामीण रूग्णालयातील नादुरूस्त अ‍ॅम्बुलन्सला आज दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागताच रूग्णालयातील कर्मचार्‍यांची धावपळ उडाली. तातडीने नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येऊन बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. दरम्यान ही अ‍ॅम्बुलन्स नादुरूस्त असल्याने ती रूग्णालय परिसरात उभी करण्यात आली होती. मात्र आग कशामुळे लागली याचा तपास यंत्रणा करीत आहे.