Private Advt

पाचोर्‍यातील तरुणाची मुलाखत देण्याच्या नावाखाली 17 हजारात फसवणूक

पाचोरा : पाचोर्‍यातील तरुणाची ऑनलाईन मुलाखत देण्याच्या नावाखाली 17 हजार 600 रुपयात फसवणूक करण्यात आली. याबाबत पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात वाढ
सोहन अशोक मोरे (24, शिवाजी नगर, पाचोरा) हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार, 2 मे रोजी दुपारी त्याला अनोळखी नंबरवरून फोन आला. नोकरीसाठी ऑनलाईन मुलाखत द्या, असे समोरील व्यक्तीने सांगितले. समोरील नंबरवरून महिलेने एक लिंक पाठविली व पेपर सोडविण्यास सांगितले. तरूण पेपर सोडवित असतांना त्याच्या बँक खात्यातून 17 हजार 600 रुपये परस्पर वर्ग करून फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पाचोरा पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार निवृत्ती मोरे करीत आहे.