पाचोरा शहरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

0

पाचोरा । शहरात परिट (धोबी) समाजातर्फे संत गाडगे बाबा महाराज यांच्या 141 वी जयंती निमित्त पालखी व मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 8 वाजता सर्व समाजबांधव हनुमान नगर (मारोती मंदिर) समोर सजविलेल्या ट्रॅक्टवर व पालखीत संत गाडगे महाराजांची प्रतिमा ठेऊन मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीत जगराज, अहिरे, दिनकर, महाले, कैलास सुर्यवंशी, गणेश सुर्यवंशी, सुरेश वाघ, राजेंद्र अहिरे, डिगंबर अहिरे, अर्जुन आंडोळे, भरत गायकवाड, गोपाल सुर्यवंशी, रविंद्र मांडोळे, बोदडे, संजय अहिरे, भास्कर महाले, शंकर माने, आदी, पाचोरा परिट (धोबी) समाज मोठ्या संख्येने सहभाग होता.