VIDEO: पाचोरा शहरातील मध्यवर्ती असलेल्या हॉटेलला भीषण आग

0

पाचोरा: शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भाग्यलक्ष्मी रेस्टॉरंटला आज गुरुवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखोंचा नुकसान झाला आहे. शाॅर्टसक्रीटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने जीवितहानी यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. सुशिल मराठे यांच्या मालकीच्या भाग्यलक्ष्मी रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वाराजवळच असलेल्या किचनला भीषण आग लागली. नगरपालिकेचे सफाई मुकादम बापु ब्राम्हणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. न. पा. अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. त्यान आग विझविली. अग्निशमन दलाचे राजु कंडारे, आबा पाटील, भिकन गायकवाड, युसुफ खान यांना आग विझविण्यात यश आले.

किचनमध्ये असलेल्या गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. घटनास्थळी नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी भेट देऊन घटनेविषयी माहिती जाणून घेतली.

Copy