पाचोऱ्यात पुन्हा चार दिवस जनता कर्फ्यु

0

व्यापारी असोसिएशनची आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थानी बैठकीत सहमती

पाचोरा: पाचोरा शहरात व तालुक्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी शनिवार दिनांक २७ ते मंगळवार दिनांक ३० जून अखेर चार दिवस जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले असून आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थानी व्यापारी असोसिएशन व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यूला सहमती दर्शवली आहे, यावेळी आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, जिल्हा उपप्रमुख अँड अभय पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील,शहर प्रमुख किशोर बारावरकर, राष्ट्रवादीचे नगरसेवक विकास पाटील, शहराध्यक्ष सतीष चौधरी सह शहरातील विविध व्यापारी असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते,
पाचोरा शहरात गेल्या चार महिन्यांपूर्वी अमळनेर व जळगांव नंतर कोरोना व्हायरसचा प्रसार झाला होता,नागरीकांनी व व्यपारी बांधवांनी स्वयंमस्पूर्तिने दोन वेळा जनता कर्फ्यूला सहमती देवून उत्स्पूर्तपणे प्रतिसाद दिल्याने इतर तालुक्याच्या मानाने कोरोना व्हायरसचा प्रसार कमी प्रमाणात झाला, मात्र यापुढे ही संख्या आटोक्यात रहावी यासाठी वेळीच दक्षता म्हणून तालुका वासियांकडून व जनतेकडून तालुका वासियांचे आरोग्य चांगले रहावे या दृष्टिकोनातून जनता कर्फ्यू लावण्याची मागणी येत असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगून शहरातील भाजीपाला, कृषी सेवा केंद्र, मेडिकल व दुध डेअरी वगळता इतर सर्व व्यवहार कडकडीत बंद पाळण्यात यावे असे आवाहन करून शक्यतो भाजीपाला विक्रेत्यांनी चार दिवस सहकार्य करावे अशी विनंती ही आमदार किशोर पाटील यांनी केली, यावेळी पाचोरा तालुक्यात ७४ कोरोना व्हायरचे रुग्ण असून ४४ रग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे,तर सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वी मृत्यू झाला आहे,कोरोना व्हायरस बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी बांबरुड महादेवाचे येथील केव्हिड सेंटरमध्ये १०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, दुर्देवाने भविष्यात रुग्णांची संख्या वाढल्यास ५०० खाटांची व्यवस्था करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे,मागिल काळात शासनाकडून लॉकडाऊन उघडण्यात आल्याने अनेक बेजबाबदार नागरीक कोरोना व्हायरसचे गांभीर्याने विचार न करता बिनधास्त पणे वागू लागले आहेत,अशा नागरीकांनी स्व:चा व इतर नागरीकांचा आयुष्याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे यामुळे पुन्हा एकदा जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले, यावेळी व्यापारी जगदीश पटवारी, गोपाल चिंचोले,संजय वाणी,परशराम मंगलवाणी, राजेंद्र कोदवाणी, ग्यानचंद ललवाणी,खेमचंद केसवाणी, रविंद्र अग्रवाल,प्रदिपकूमार संचेती, अनूप अग्रवाल, अनुराग भाटिया,अनिल चंदवाणी, दौलत केसवाणी, किरण पाटील,हुशेन नागरीया,मुर्तूजा भारमल,होजेफा लोखंडवाला,सुरेश जैन,प्रविण दायमा, रविंद्र भोई,सलीम बागवान सह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते.

Copy