पाचोरा पिपल्स बँकेच्या निवडणुकीसाठी शेंदुर्णीत प्रचाराचा शुभारंभ

0

शेंदुर्णी : येथील पुरातन हेमाडपंथी काशिविश्वेश्वर मंदीरात पाचोरा पिपल्स बँकेचे 2017-22 या कालावधीसाठी होऊ घातलेल्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी नम्रता पँनलच्या उमेदवारांचे प्रचाराचा शुभारंभ शेंदुर्णी-नाचणखेडा जि.प.गटाचे सदस्य संजय गरुड व पँनल उमेदवार यांच्याहस्ते नारळ वाढवुन करण्यात आला. यावेळी बँकेचे विद्यमान अध्यक्ष अशोक संघवी यांनी बँकेचा धावता प्रगती आढावा मांडून उमेदवारांचा परीचय करुन देतांनाच नम्रता पँनलचे उमेदवारांना निवडुन देण्याचे आवाहन केले. प्रमुख उपस्थीतांमधून संजय गरुड, उत्तम थोरात, सागरमल जैन यांनी पँनलचे उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले तर उपस्थित सभासदामधुन शांतीलाल जैन यांनी बँकेच्या इतर शाखासाठी इमारती आहेत. शेंदुर्णी शाखेची 100 टक्के कर्ज वसुली होते 0 टक्के थकबाकी प्रमाण व सतत नफ्यात असतांना शाखेसाठी स्वमालकीची इमारत गेले. 35 वर्षात स्थानिक संचालक, अध्यक्ष व संचालक मंडळाने का बांधुन दिली नाही. सापत्न वागणुक का दिली जाते असा आरोप उपस्थित करून आपली नाराजी व्यक्त केली.

बँकेच्या प्रगतीच्या आढावा सभासदांची उपस्थिती
निवडणुकी नंतर शाखेसाठी स्वमालकीची इमारत बांधण्याचे आश्वासन पँनल प्रमुख अशोक संघवी यांनी दिले. यावेळी राजमल अग्रवाल, चंद्रकांत लोडाया, पारस ललवाणी, प्रा.भागवत महालपुरे, विकास वाघ, नंदकिशोर सोनार, अमोल शिंदे, अविनाश भालेराव, किशोर शिरुडे, कांतीलाल जैन हे उमेदवार व प्रमुख उपस्थीतांमध्ये संजय गरुड, पं.स.सदस्य शांताराम गुजर, उत्तम थोरात, सुधाकर बारी, अशोक औटे, अशोक जैन, रमेश जैन, सागरमल जैन, कांतीलाल जैन, काजेश कोटेचा, राजु परदेशी, डॉ.किरण सुर्यवंशी, डॉ.बैरागी, डॉ.अतुल पाटील, सुरेश ओस्तवाल व बँकेचे सभासद उपस्थीत होते.