पाचोरा पिपल्ससाठी 50.21 टक्के मतदान

0

पाचोरा । पाचोरा तालुक्यातील सहकारातील सर्वात मोठी व प्रतिष्ठित व्यापारी वर्गाच्या पाचोरा पिपल्स को- ऑप बँकेची निवडणुक मतदान प्रक्रिया शहराच्या गो.से. हायस्कूल येथे पार पडली. आज मा. आमदारांच्या पाठिंब्यांवर सहकार पॅनल व बँकेचे विद्यमान चेअरमन यांचे नम्रता पॅनलमध्ये सरळ व चुरशीची लढत झाली आहे. 2 जानेवारी रोजी महालपुरे मंगल कार्यालयात मतमोजणी होणार असून पुढील बँकेची सत्ता मतदार सदस्यांनी नेमकी कोणाच्या हाती दिली याचे भवितव्य ठरणार आहे.

पाचोरा तालुक्याच्या व शहराच्या राजकारणाला भुरळ घालणार्‍या ह्या बँकेचे सहकारात व राजकारणात व्यापार्‍यांची बँक असल्याने वेगळे अस्तित्व व वर्चस्व नेहमीच राहिले आहे. मागील दहा वर्षात बँकेच्या सत्ताधार्‍यांकडून दिग्गज राजकारण्यांना निवडणुकांमध्ये या- ना- त्या कारणांवरून जय- पराजयाच्या लढाईत प्रभावित करण्याचे कारस्थाने झाली आहेत. ही निवडणुक नगरपालिके नंतर लागल्याने पिपल्स बँकेत असणार्‍या सत्ताधार्‍यांना पायउतार करण्याची संधी पाहणार्‍या आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांना काही नाराज आजी माजी संचालकांनी साकडे घातल्यावरून या दोन्ही नेत्यांच्या पाठींब्यावर व राजाश्रयात सहकार पॅनलमधून नाराज शांताराम पाटील, अतुल संघवी, प्रशांत अग्रवालसह अनेक विद्यमान व तत्कालीन संचालकांनी हेकेखोर चेअरमन संघवी यांचे विरोधात दमदार पॅनल तयार करून निवडणुकीत उतरले होते. तर विद्यमान चेअरमन यांनीही आजी- माजी आमदारांचे आव्हान स्विकारून नम्रता पॅनलमध्ये राजकारण्यांना सोबत घेऊन नम्रता पॅनल रिंगणात उतरविले. निवडणुक काळात पिपल्स बँकेच्या आर्थिक धोरणांवर दोन्ही पॅनलकडून आरोप प्रत्यारोप करून आपापल्या बाजू मांडल्या गेल्या. बँकेची सत्ता सर्व सामान्य सभासद व कर्जदारांच्या हितासाठी सहकार पॅनलकडे देण्याचे आवाहन आजी- माजी आमदारांनी केले. तर बँकेत भविष्यात राजकारण्यांच्या पाठींब्याची सत्ता आल्यास बँक बुडीत निघणार असा प्रचार नम्रता पॅनल प्रमुखांकडून झाला आहे.

असे झाले मतदान
1 रोजी झालेल्या मतदानात व एकूण 17280 पैकी पाचोर्‍यातील 10808 पैकी 5270, जळगाव 112 पैकी 73, भडगाव 1585 पैकी 719, जामनेर 2575 पैकी 1350, शेंदुर्णी 1031 पैकी 690, नगरदेवळा 1172 पैकी 530 मिळून 8632 मतदान झाले आहे. आज येणार्‍या निकालातुन पाचोरा पिपल्स बँकेच्या आर्थिक सत्ता कारणाचा निकालातुन पुढच्या पाच वर्षाचे भवितव्य ठरणार आहे.