पाचोरा तालुक्यात वीर श्री एकलव्य याची जयंती उत्साहात

0

पाचोरा । शहरासह तालुक्यातही आदिवासी एकता परिषदेच्या वतीने भिल समाजाचे दैवत वीर एकलव्य याची जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक बहीरम नगर कृष्णापुरी पासून ते आठवडे बाजार देशमुख वाडी स्टेशन रोड ते मंसिगका कॉर्नर मार्गे काढण्यात आली या मिरवणुकीनंतर मासिंगका कॉर्नरच्या पटांगणात समाजाचे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात समाज बांधवांना समाजाविषयी प्रबोधन करण्यात आले. समाजाचा विकासासाठी समाजाला मुलभूत गरजा मिळावे, शिक्षणाबाबत जनजागृती, नोकरी करा व व्यवसाय करून आर्थीक दृष्या सक्षम व्हावे यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

वीर एकलव्य देखावा दाखवून मांडले कार्य व विचार
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर वीर एकलव्य देखावा दाखवून वीर एकलव्य यांनी केलेल्या कार्य व त्याचे विचार मांडण्यात आले. वीर एकलव्य हे नेहमी मुक्या जनावरांना व शिकारी करताना बाण मारत होते. मात्र ज्याला बाण मारायचे त्याच्या जखमेवर रक्त येत नाही असा चमत्कार घडत असे मात्र इतर समाज बांधवांना या बाबत अंधश्रद्धा असायची, मात्र एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील भिल समाजाचे सदाशिव अर्जुन, वसंत पवार, दीपक बागुल, भिवंसन सोनवणे या कलाकारांनी तोंडाच्या जिभेवर लोखंडी सूरीने होल पडून सूरी खाली कृती करून दाखवली. सुनील गायकवाड यांनी बोलताना सांगितले की, आदिवासी समाजाकडे केंद्र शासनाने व राज्य शासनाने दुर्लक्ष केलेले आहे. म्हणून अधिवाशी समाज शिक्षणापासून व विविध योजनेंपासून वंचित आहे. समाजाचा विकासासाठी समाजाला मूलभूत गरजा मिळाव्या शिक्षण, नोकर्‍या, व्यवसाय मिळावे. या करीता केंद्र शासनाने व राज्य शासनाने आदिवासी समाजाकडे लक्ष देण्याची गरज आहे. समाजाच्या हितासाठी समाजाच्या चांगले स्थान मिळावे. या करता सर्व अदिवाशी समाजबांधव लवकर धारेवर धरण्यासाठी एकत्र येणार असल्याचे सांगितले.

समाज बांधवाची उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी एकता परिषदचे जिल्हा अध्यक्ष सुनील गायकवाड व प्रमुख अतिथी जयाताई भिल, सखाराम ठाकरे, मनखा तडवी कार्यक्रमाचे आयोजक धर्म भिल, अनिल निकम, शांताराम मोरे, सुभाष मोरे, एकनाथ आहिरे यांनी सहकार्य केले. यावेळी यशवंत आहिरे, विजू सोनवणे, मुकेश वाघ, भगवान भिल, अनिल गायकवाड, अनिल भिल, बापू मोरे, रवींद्र भिल, सुभाष भिल, वसंत भिल, तुकाराम भिल, साईनाथ भिल, शांताराम भिल, बबन भिल, दीपक भिल व समाजाचे महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.