पाचोरा तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायतीत महिला राज

0

तालुक्यातील पहिली बिनविरोध ग्रामपंचायत होण्याचा मान

पाचोरा: पाचोरा तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायतीवर महिला राज येणे निश्चित झाले असून, सर्व सातही जागांवर महिला सदस्यांची एकमताने निवड करत गावाने अनोखा आदर्श घालून दिला आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन पॅनलमध्ये होणारी संभाव्य लढत टळली असून, गावविकासासाठी सर्वांची एकी कामी आली आहे. आगामी काळात सरपंच पदही अडीच अडीच वर्षासाठी विभागून
घेतले आहे.

पॅनल प्रमुख शशिकांत गोविंदराव पाटील, अभिमन सिताराम पाटील, अधिकार अमृत पाटील, परशुराम संतोष पाटील, चंद्रकांत सांडू पाटील, राजेंद्र भावजी पाटील, ज्ञानेश्वर युवराज पाटील, उत्तम सुपडू तेली, गुणवंत रामराव पाटील, हरी सखाराम सुरवाडे यांच्यासह सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीने बिनविरोधचा झाला निर्णय झाला आहे.

बिनविरोध उमेदवारांची नावे
उमेदवारी दाखल करणार्‍या व बिनविरोध ठरलेल्या उमेदवारांची वार्डनिहाय नावे वंदनाबाई श्रीराम वाघ (पाटील) वार्ड नंबर-1, संगिताबाई अशोक पाटील वार्ड नंबर-1, शोभाबाई संतोष तेली वार्ड नंबर-1, सुमित्राबाई गुणवंत पाटील वार्ड नंबर-2, दिप्ती संजय पाटील वार्ड नंबर-2, सुवर्णा अधिकार पाटील वार्ड नंबर-3, कमलबाई हरी सुरवाडे
वार्ड नंबर-3.

Copy