पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

पाचोरा : तालुक्यातील अंतुर्ली येथील सतरा वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार, 22 जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मुलगी गावातून बेपत्ता झाली. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. तिचा दिवसभर शोधाशोध करूनही ती मुलगी घरी न आल्याने गुरूवार, 23 जून रोजी नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली. पीडीत मुलीच्या भावाने तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील करीत आहेत.