पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उद्या ‘रानभाजी महोत्सव

पाचोरा : पाचोरा तालुका कृषि अधिकारी व निर्मल सिड्स प्रा. लि., पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील गिरड रोडवरील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात फळ रोपवाटीका येथे ‘रानभाजी महोत्सव’ आयोजित करण्यात आलेला आहे.
या महोत्सवासाठी पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहे. मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अन्नन्यसाधारण महत्व आहे. सकस आहारामध्ये रानभाजींचा समावेश
वाढावा याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने सदर महोत्सव आयोजीत करण्यात येत आहे. सदर महोत्सवाचा पाचोरा तालुका व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाचोरा तालुका कृषी अधिकारी आर. एन. जाधव यांनी केले आहे