पाचोरा-जामनेर (पीजे) रेल्वे मार्गाची पाहणी

0

शेंदुर्णी : येथील रेल्वे स्टेशनवर भुसावल रेल उपव्यस्थापक धार्मिक धर्माधिकारी यांना एफ.यु.तडवी व शालेय विदयार्थी, विदयार्थीनी आणि प्रवाश्यांनी पाचोरा – जामनेर पी-जे नियमीत वेळेनुसार धावण्यासाठी निवेदन देण्यात आले. शुक्रवार 9 डिसेंबर रोजी पाचोरा जामनेर रेल्वे मार्गाचे पाहणी दौर्‍यासाठी जामनेर येथुन सकाळी 11.25 वाजता पीजेने प्रवास सुरु करुन उपव्यवस्थापक धर्माधिकारी व इतर अधिकार्‍यांनी पाहणी केली त्यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले.

गाडी अनियमित असल्यामुळे प्रवाश्यांचे हाल
शेंदुर्णी येथे समस्या मांडतांना प्रवाशांनी आधीही गाडी अनियमीत वेळे नुसार धावत असल्याबद्दल नियमीत प्रवास करणारे प्रवासी तसेच विद्यार्थी व रेल्वेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे 27 जुलै 2016 रोजी रेल्वेमंत्री व संबधीत अधिकारी वर्गास निवेदन पाठविले होते. परंतु अद्यापपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पाचोरा जामनेर (पी-जे) गाडी अनियमीत पणे धावत आहे. गाडी अनियमित असल्यामुळेचा आर्थिक फटका सर्वसामान्य प्रवाशांना तसेच प्रवासी संख्या कमी झाल्याने रेल्वेच्या उत्पन्नात घट होउन रेल्वेला सुद्धा बसत आहे.

गाडी वेळापत्रकानुसार चालविण्यात यावी व प्रवाशांना दिलासा मिळावा अशी मागणी गुरूवार 8 डिसेंबर 2016 रोजी पुन्हा प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी करणारे 70 प्रवाशांच्या सह्याचे निवेदन देउन रेल उपव्यवस्थापक धर्माधिकारी यांचे कडे करण्यात आली. प्रवाशांच्या वतीने त्यांचा रेल्वेचे नियमीत प्रवासी तथा पाचोरा पिपल्स बँकेचे शाखा व्यवस्थापक एफ.यु. तडवी यांनी पुष्पहार व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
शेदुर्णी स्टेशन प्रमुख विलास अहिरे यांनी स्टेशन वरील प्रवाशांच्या समस्या मांडल्या, सत्काराचे वेळी धर्माधिकारी यांनी लवकरच प्रवाशांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी त्यांचे सोबत अजयकुमार (ऐसीएम/टीसी), डिएचओ श्री. सयालीन, डीएनओ सिन्हा, डीएमओ गजभिये इंजिन भुसावल मंडळ रेल्वेचे अधिकारी व पाचोरा पीडब्ल्युआय साळुंखे उपस्थीत होते.