पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र जमण्यास मनाई

0

राज्यभरात कलम 144 लागू, राज्य लॉकडाऊन

मुंबई । मुंबईतील लोकल आणि राज्यातील एसटीसेवा पूर्णतः बंद करण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण गुणाकार पद्धतीने वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हे निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. अन्नधान्याचा अनावश्यक साठा करून ठेवू नका, राज्याकडे पुरेसा साठा असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री काय म्हणाले,

  • प्रत्येक कार्यालयातील हजेरी पाच टक्क्यांवर आणली.
  • संपूर्ण नागरी भागात कलम 144 लागू. पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई. रात्री नऊ वाजेनंतर बाहेर निघू नका.
  • कोरोनाच्या संवेदनशील टप्प्यात पाऊल
  • भाजीपाला वाहतूक, दूध, किराणा दुकान, आर्थिक व्यवहाराची केंद्रे (बँक, कार्यालय, शेअर मार्केट) सुरु राहणार
  • घरून काम करा
Copy