पाक गोलंदाज मोहम्मद इरफान निलंबित

0

इस्लामाबाद । पाक संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप होते.याप्रकरणाचा तपासानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद इरफानला निलंबित केले आहे.पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी इरफानची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी शर्जील खान आणि खालिद लतिफवर पीसीबीने आधीच निलंबनाची कारवाई केली होती.इरफानने संशयित सट्टेबाजाशी संपर्क ठेवल्याचे कबूल केले. मात्र त्याविषयी पीसीबीला त्याने माहिती दिली नव्हती.या प्रकरणी पीसीबीने मोहम्मद इरफानला नोटीसही बजावली असून त्याची बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे.या दरम्यान मोहम्मद इरफान निलंबितच राहिल. तो कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहभागी होऊ शकत नाही. पीसीबीकडून त्याला चार्जशीटही देण्यात आली आहे. त्याच्यावर पीसीबीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.