पाकीस्तानमध्ये बॉम्बस्फोट; 30 ठार, 40 जखमी

0

पेशावर: कराचीतील आजची घटना ताजी असतानाच खैबर पख्तुनख्वा प्रांतात शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटानं पाकिस्तान हादरलं. दुपारच्या दरम्यान खैबर पख्तुनख्वा प्रांतातही शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. यात 30 जणांचा मृत्यू झाला असून 40 जखमी झाले आहेत.

ओराकझाई जिल्ह्यातील कालाया परिसरातील इमामबर्गाहजवळ जुमा बाजारात हा शक्तीशाली स्फोट झाला. यात किमान 30 नागरिक ठार झाले तर 40 जण जखमी झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. स्फोटातील मरण पावलेले अनेक नागरिक शिया मुस्लीम समाजाचे आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. स्फोटानंतर परिसराला घेराव घातला असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कराचीमध्ये बॉम्बस्फोटानंतर खैबर पख्तुनख्वा पोलिसांनी अॅलर्ट जारी केला आहे. ‘शत्रूंना आमच्या प्रांतातील शांतता पाहावत नाही,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री मेहमूद खान यांनी दिली.