पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये दहशतवादी हल्ला

0

कराची: पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. कराची स्टॉक एक्सेंजवर हा दहशतवादी हल्ला आहे. दहशतवादी स्टॉक एक्सेंजमध्ये घुसले असून त्यांच्याकडून झालेल्या गोळीबारात दोन लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असून काही जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे. जवळपास चार दहशतवादी स्टॉक एक्सेंजच्या इमारतीत घुसले आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांनी मुख्य गेटवर ग्रेनेड हल्ला केला आणि नंतर गोळीबार करत इमारतीत घुसले”. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात इमारतीच्या बाहेर सुरक्षेसाठी तैनात एक पोलीस अधिकारी आणि सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. स्टॉक एक्सेंजमध्ये ग्रेनेडचाही वापर करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Copy