पाकिस्तानी तरुणीला प्रियंका चोप्राचे सडेतोड उत्तर

0

नवी दिल्ली: पाकिस्तान स्थित बालाकोट येथे भारतीय हवाईदलाने हल्ला करत जैश ए मोहमदचे तळ उध्वस्त केले होते. या हल्ल्यानंतर सिने अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून कौतुक करत जय हिंद ट्वीट केले होते. प्रियंकाने ट्वीट केल्यानंतर पाकिस्तानविरोधात आण्विक युद्धाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत अमेरिकेतील एका कार्यक्रमात एका पाकिस्तानी तरुणीने अभिनेत्री प्रियांका चोप्रावर हल्लाबोल केला.

https://twitter.com/ItsnotKadi/status/1160308662881046528

प्रियांकाने २६ फेब्रुवारी रोजी भारतीय सैन्याबाबत केलेल्या ट्विटवरून त्या तरुणीने सवाल केला. संयुक्त राष्ट्रांची सद्भावना दूत म्हणून तुझी निवड करण्यात आली. मात्र तू तर पाकिस्तान विरोधात आण्विक युद्धाला प्रोत्साहन देत आहेस. माझ्यासारख्या अनेक लोकांनी अभिनेत्री म्हणून तुला आजवर पाठिंबा दिला आहे, असे पाकिस्तानी तरुणीने प्रियांकाला विचारले आहे.

पाकिस्तानी तरुणीचे पूर्ण ऐकून घेतल्यानंतर प्रियांकाने तिला उत्तर दिले आहे. मी भारतीय असून माझे अनेक मित्र पाकिस्तानी आहेत. मला स्वतःला युद्ध व्हावे असं वाटत नाही. पण मी देशभक्त सुद्धा आहे. माझ्या त्या ट्वीटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील मी त्यांची माफी मागते. तरुणीच्या ओरडून बोलण्यावर प्रियांका ने म्हटले आहे की, माझ्या मते सर्वांसाठी एक मध्यम मार्ग असतो. तुझ्यासाठीही असेल. पण ज्या पद्धतीने तू माझ्यावर ओरडून बोलत आहेस हे योग्य नाही. आपण इथं प्रेमाच्या भावनेनं एकत्र आलो आहोत.