पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड

0

कराची । पाकिस्तानातील दक्षिण सिंध प्रातांत एका हिंदू मंदिरात काही अज्ञातांनी तोडफोड केल्याचे उघडकीस आले आहे. या तोडफोडीनंतर मंदिरातील देवदेवतांच्या मूर्त्यांची विटंबना करून त्या गटारात फेकल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी यासंदर्भात तीन अज्ञात व्यक्तींवर ईश निंदा (ब्लासफेमी) आणि दहशत पसरवल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

स्थानिक हिंदू नगरसेवक लाल माहेश्‍वरी यांनी सांगितले की, आरोपी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मंदिरात घुसला असावा. त्याने मंदिराची तोडफोड केली. एवढ्यावरच न थांबता त्या आरोपीने मंदिरात असलेल्या मूर्त्यांचीही विंटबना करून त्या फोडून टाकल्या आणि नंतर त्या गटारात फेकल्या. मिंंदरात सकाळी पूजा करण्यासाठी भाविक आल्यावर ही घटना उघड झाली. माहेश्‍वरी म्हणाले की, मंदराच्या इतिहासात असा प्रसंग पहिल्यांदाच घडला आहे.

अल्पवयीन मुलावर संशय
कराचीपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या थट्टा जिल्ह्यातील घारो गावात ही घटना घडली आहे. या गावाची लोकसंख्या 2 हजार इतकी असून, हे सर्व गावकरी हिंदू आहेत. पोलीस अधिकारी फिदा हुसैन मस्तोई हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. याप्रकरणी तिघा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, मंदिरात आढळलेल्या बोटांच्या ठशांनुसार एक अल्पवयीन मुलावर संशय व्यक्त करण्यात आला. हा मुलगा 12 वर्षांचा आहे. पाकिस्तानातील मंदिरांची अवस्था अत्यंत खराब असून सरकारकडून मदत मिळत नाही.